Manoj Jarange Full Speech Azad Maidan : दोन तासात मुंबई मोकळी करा, आझाद मैदानातील पहिलं भाषण
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha For Reservation: ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईत (Mumbai News) दाखल झाले आहेत. मानखुर्द, चेंबूरमध्ये जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे, आझाद मैदानही हाऊसफुल झालं आहे. आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर एवटलेल्या शेकडो मराठा आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, यावेळी त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आणि शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.






















