Manoj Jarange Full PC : ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही
कॅबिनेट रद्द झाली मला माहित नाही पण प्रत्येक वेळी शंका काय घ्यावी आपली डेड लाइन 13 जुलै आहे, आपल्या मागण्या तो पर्यंत पूर्ण कराव्यात हेच आमचे म्हणणे आहे...आपले बैठकीत ठरलेले 9 विषय पूर्ण व्हावे हीच अपेक्षा..
त्यांना आरक्षण असून ते लढताय तर आम्हाला नाहीय मग आम्ही किती लढू सांगा, असणारे लढतात तर नसणारे काय करतील... आता सगळे येतील..एकत्र होतील...मिळू नये म्हणून लढतात तर हवंय म्हणून आम्ही किती लढणार, ते विष ओकताय मराठ्यांविरोधात...आता मराठा नेत्यांनी एकत्र यावे...आपण उघडे डोळे ठेऊन पाहावे का आता सगळ्यांना उघडे पाडणार..
पंकजा आणि धनंजय का गेले आमचा विरोध नाही त्यांचा विरोध दिसतोय,हे सगळ्यांना माहीत आहे...
आता नसलेला मराठा एकत्र होईल, मला त्या आंदोलनाने फायदा झाला.. दुश्मनी सारखे मागताय... ते हजारपटीने एकत्र आले तरी आरक्षण मराठे ओबीसी मधून घेणार..
भुजबळ केव्हा आंदोलनात नव्हते, आहेच , उभं आयुष्य त्यांचं पाप करण्यात गेले , ते पहिलेपासून विरोधात आहे.. त्यांच्या कडून आम्हाला अपेक्षा नाही...
आमचा त्यांना विरोध नाही, आम्ही बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नाही...राजकीय फायद्यासाठी आमचे आंदोलन नाही ते आंदोलन खुनशी पणाने करताय... तिथं 100 मंत्री आले तर आम्हाला काय दुःख...
ओबीसी आणि मराठ्यांचा वाटोळं करणारे कोण लै पाप घेतलं आहे त्याने डोक्यावर , धनगर बांधवांचे ही त्यानं वाटोळं केलं आहे ( भुजबळ वर )
त्यांना माझी भाषा कळणार नाही, ते मला आता व्हीजे एन टी शिकवताय ते आता शिक्षक झाले का..
द्यापाऊन आम्ही एकमेकांना भाऊ ही म्हणू नये असे तुम्हाला म्हणायच आहे का, जातीय दंगलीसाठी आंदोलन करायचं का
10 महिने झाले मी धनगर आरक्षण देईल म्हणतो तरी एकही धनगर आंदोलक आमच्या पाठीशी नाही.. तरी आम्ही या मुद्फ्यावर सरकारला अंगावर घेतो
ओबीसी विरुद्ध मराठा वाद त्यांना करायचा आहे..
मी आरक्षण ओबीसी मधून घेतल्या शिवाय थांबणार नाही...
कुणी मारून टाकील म्हणते कुणी म्हणतंय गोळ्या घालीन मागे तर असे आले कचाट्यात सापडले की हाणू, सरकार यावर लक्ष देत नाहीत, सरकारला हि वाटते घातपात झाला पाहिजे, अस वाटतंय...आम्हाला मेलेलं दाखवा काही दाखवा, सरकार दुर्लक्ष करते...
मृत्यू अफवा बातमीवर
आमचं आंदोलन संपल्यावर मी स्वतः म्हणालो धनगर आणि मुस्लिम अरक्षणवर लढणार...
राजकीय मराठयांनी सावध व्हावे...आपल्या लेकरांकडे बघा...
आम्हाला मराठा नेत्यांनी आता साथ दिली नाही तर एकालाही एकही नेत्याला आम्ही विधानसभेत मदत करणार नाही, सगळ्या नेत्यांनी ताकतीने उभे राहावे
अधिवेशनात सगळ्या मराठा नेत्यांनी अधिवेशन गाजवायला हवे त्यांचा त्रागा बघा आभाळ कोसळल्यासारखे करताय
धनगर बांधवांना मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे , ते मागे आले का आणि न आले आम्ही लढणार...