(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tulshi Baug Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन
Tulshi Baug Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन
पुणे: पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन अतिशय संथ गतीनं सुरु आहे. विसर्जन (Ganapati Visarjan) मिरवणूक सुरू झाली त्या मंडईच्या टिळक पुतळ्यापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बेलबाग चौकात पाचवा मानाचा गणपती पोहचायला पाच तास लागले आहेत. पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक बरोबर साडे दहा वाजता सुरु झाली. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तासाभराच्या फरकाने दोनशे मीटर वर असणाऱ्या बेलबाग चौकात पोहचले.
शेवटचा अर्थात पाचवा मानाचा गणपती असणारा केसरीवाडा साडे तीन वाजता बेलबाग चौकात पोहचला. तिकडे याच बेलबाग चौपातून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अलका चौकात अद्याप मानाचा पहिला कसबा गणपती ही पोहचलेला नाही. त्यामुळं यंदा ही पुण्यातील गणपती विसर्जनाच्या (Ganapati Visarjan) मिरवणुका किती तास चालणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.