Maharashtra Superfast : तुमच्या जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024
मराठा आरक्षण सुनावणी, राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस, १० जुलैच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, आयोगाला प्रतिवादी करण्यास विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची माघार.
६ जुलैला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीचा मेळावा, मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता.
दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० रुपये शिवाय पाच रुपये अनुदान असे ३५ रुपये शेतकऱ्यांना मिळणार, तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे ३० रुपये देणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार, कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्याचे शाळांना आदेश.
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी.
एबीपी माझाच्या बातमीचा दणका. महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळेविरोधात गुन्हा दाखल. वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. एबीपी माझानं सर्वात आधी दाखवली होती बातमी.
छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु.
बीडच्या केकत सारणी गावात चार तरुणांचं शोले स्टाईल आमरण उपोषण, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तरुणांची मागणी.
अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात ठाकरे गट आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा केला निषेध. अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ लावले बॅनर.