Maharashtra Rain News: तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 28 जुलै 2024: ABP Majha
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले, धरणातून सध्या 2 लाख 50 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी एक इंचाने कमी, सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४७.७ फूटांवर .
कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद, कोल्हापूरकरांना मोठा दिलासा.
अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख पाण्याचा विसर्ग , यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक इंचाने घट.
कोल्हापुरात पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत सामाजिक कार्यकर्त्याने त्याचा जीव वाचवला, हृदयविकाराचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णाला संभाजी घोरपडेंनी तात्काळ रुग्णालयात केलं दाखल.
नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात मोटरसायक नेणं पडलं महागात, तरुण थोडक्य़ात बचावला, मोटरसायकल मात्र गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल.
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात तीन जण अडकले, अडकलेल्या तिघांनीही झाडाचा आधार घेतला.
गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस, पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ, पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरलं, ५० पेक्षा अधिक दुकानं, घरे पाण्याखाली
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/1e86bed809a893fbb134c6a782018ced173936301731990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/75a742c0f231f6596416af65bfd4bc2a173936144925590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/2fa22b227952973735645635833ddf331739350809462977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 12 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/15b0a32c3e5049b7199e8a4764f28b461739347983543977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)