एक्स्प्लोर
Maharashtra Power Employees Strike | 72 तासांचा संप, MESMA लागू तरी कर्मचारी ठाम!
राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मध्यरात्रीपासून बाहत्तर तासांच्या संपावर गेले आहेत. सरकारने मेस्मा (MESMA) लागू करत हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मात्र, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. "मेस्मा जरी लागू केला असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही," असा निर्वाणीचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. संपामुळे पुढील तीन दिवस राज्यातील वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असणार आहे. राज्यात अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी खाजगी कंपन्यांना देण्याच्या प्रक्रियेला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. सर्वोच्च पदावरील निवडक अधिकारी वगळता सुमारे नव्वद टक्क्यांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी संपावर गेल्याचा दावा कृती समितीने केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू आहे. नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या दारासमोर महानिर्मितीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे वीज निर्मिती, वीज वहन (महापारिश्रम) आणि वीज वितरण (महावितरण) या तिन्ही कामांमध्ये ऊर्जा विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून बादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने वीज यंत्रणेत दोष उद्भवल्यास दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण येण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















