एक्स्प्लोर
vidhansabha Anil Pararb Vs Shambhuraj Desai : बाहेर ये तुला दाखवतो, अनिल परब-शंभुराज देसाईंमध्ये हमरीतुमरी
काल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार Sanjay Gaikwad यांनी कँटीनमध्ये गुंडाप्रमाणे हणामारी केली. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार Anil Parab आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार Shambhuraj Desai यांच्यात सभागृहात खडाजंगी झाली, जी सभागृहाच्या प्रतिष्ठेला न शोभणारी होती. मराठी माणसांना मुंबईत पन्नास टक्के घरं देण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना ही घटना घडली. Anil Parab यांनी Shambhuraj Desai यांच्यावर ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना 'गद्दारी' करत असल्याची टीका केली. या टीकेनंतर Shambhuraj Desai यांचा तोंड सुटला आणि त्यांनी थेट 'तू बाहेर ये तुला दाखवतो' अशी भाषा Anil Parab यांच्यासाठी भरसभागृहात वापरली. या घटनेमुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. सभागृहाबाहेर आल्यानंतर Shambhuraj Desai यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले. आमदारांमधील या वाढत्या संघर्षाने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील घरांच्या मुद्द्यावर सुरू असलेली चर्चा आणि आमदारांमधील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र



















