Maharashtra HSC Board Exam : महाराष्ट्रभर कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा पुरता फज्जा
महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यायत. मात्र या परीक्षांना कॉपीचं ग्रहण लागलंय. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी दिली नाही म्हणून एका एजंटला बेदम मारहाण करण्यात आलीय. हमखास उत्तीर्ण होण्याची गॅरंटी अशी जाहिरात केलेल्या या केंद्रात मुंबई, पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. तर तिकडे परभणीच्या सोनपेठमध्ये चक्क शिक्षकांनीच इंग्रजी विषयाचा पेपर फोडलाय. पेपर फोडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्यामुळे सहा शिक्षकांना अटक करण्यात आलीय. त्याचसोबत यवतमाळच्या मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई शाळेत इंग्रजीचा पेपर व्हायरल करण्यात आलाय. तिकडे जळगाव जिल्ह्यातही काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचं वाटप होऊन काही क्षण होतायत तोच, उत्तरांसह सोशल सोशल मीडियावर व्हायरल झालीय. एकूण, महाराष्ट्रभर कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळालाय.