Maharashtra Heat Wave Precautions : महाराष्ट्रात ठिकठिकाणी उष्णतेची लाट, बाहेर पडताना काय काळजी?
Vidarbha Weather Update नागपूर : राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा तर अकोला शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य उन्हाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. असे आवाहन देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आले आहे.
विदर्भातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत. अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्याचे आदेश अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
तर दुसरीकडे आजपासून पुढील दोन दिवस अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच आगामी 29 मे पर्यंत चंद्रपुर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांत उष्णतेची लाटेचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.