Ujjwal Nikam In Gym : निकालादिनी निवांत! उज्ज्वल निकम नातवासह जिममध्ये Lok Sabha Elections
मुंबई: संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकालाचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार देशातील 276 जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये एनडीए 186 आणि इंडिया आघाडी 71 जागांवर आणि इतर पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहे. तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात भाजप सहा जागांवर, शिंदे गट दोन, उद्धव ठाकरे गट 5 जागांवर तर शरद पवार गटाचे उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहे.
मुंबईतून सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पहिला कल हाती आला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तर धुळ्यातून भाजपच्या हिना गावित आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक संस्थांनी एक्झिट पोल्स जाहीर केले. यापैकी बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळताना दिसत आहे. एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 353 ते 383 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीला 24 आणि महाविकास आघाडीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
