एक्स्प्लोर
Land Row: 'फाईलचा प्रवास Rafale च्या वेगाने', Sanjay Raut यांचा BJP मुख्यालयावरून थेट सवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले, पण त्याचवेळी विरोधकांनी या जागेवरून जोरदार हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करताना म्हटले की, 'या जागेसाठी फाईल ज्या पद्धतीनं वेगाने हल्ली, तो प्रवास जो होता तो संपूर्ण प्रवास राफेलच्या गतीनं झाला'. राऊत यांनी या प्रकरणी अमित शहा यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची जागा धोकादायक असल्याचे दाखवून भाजपने ती ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईत ही नवीन इमारत उभारली जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















