(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MVA Manifestoआता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत,सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर हसू
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार सत्तेवर आल्यास 100 दिवसांचा अजेंडाही सादर केला आहे. महाविकास आघाडीने महिला, शेतकरी, युवक, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, सुशासन आणि शहरी विकासाच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या सन्मानासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर कोणताही विचार न करता योजना सुरु करण्यात आली, असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता. यानंतर आता महाविकास आघाडीकडून योजनेतील पैसे वाढवण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रावर किती कोटींचा बोजा वाढणार याबाबत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली.