एक्स्प्लोर
Konkan Rains: 'भातशेतीचे पंचनामे करून भरपाई द्या', संतप्त शेतकऱ्यांची मागणी; सिंधुदुर्गात पर्यटन ठप्प
अरबी समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेली पिके सडत असून, 'आमच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,' अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर तीन नंबरचा बावटा लावून मच्छीमार आणि पर्यटकांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातसह स्थानिक मच्छिमारी बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला असून, मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे पर्यटन आणि मासेमारी व्यवसाय ठप्प झाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement

















