Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Dharmendra Hospitalised: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dharmendra Hospitalised: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Hospitalised) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) दाखल करण्यात आले आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी (रुटीन चेकअप) असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या टीमने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावरून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. “आमचे ही-मॅन लवकर बरे व्हावेत,” अशा भावना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्या जात आहेत.
Dharmendra Hospitalised: धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
धर्मेंद्र यांना याआधीही काही वेळा आरोग्याच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. 2022 मध्ये स्नायू ताणामुळे त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. त्या वेळी त्यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती आणि काळजी न करण्याचं आवाहन केलं होतं. वयाची ऐंशी पार केली असली तरी धर्मेंद्र अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र 90 वर्षांचे होणार आहेत. सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
Dharmendra: धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार
दरम्यान, धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धातील शूरवीर अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अगस्त्य नंद अरुण खेतरपाल यांची भूमिका साकारत असून, धर्मेंद्र त्यांचे आजोबा म्हणून पडद्यावर दिसतील. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Dharmendra: धर्मेंद्र यांनी दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत.
आणखी वाचा
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
























