एक्स्प्लोर
BJP Slams Rahul: राहुल गांधींवर देशविरोधी शक्तींशी संगनमताचा गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर परदेशात भारताची बदनामी केल्याचा आणि लोकशाही संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला आहे. 'राहुल गांधी देश विरोधी ताकतों के साथ मिलकर के जो षड्यंत्र रचा रहे हैं, वह कभी सफल नहीं होगा,' असे म्हणत रिजिजू यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिजिजू म्हणाले की, त्यांचा पक्ष निवडणुकीत हरल्यावरही त्यांनी कधीही न्यायालय किंवा निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली नाही. काँग्रेस तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये जिंकल्यावर लोकशाही धोक्यात कशी येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जागतिक मंदीच्या काळातही भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्क्यांच्या वर आहे आणि देशातील तरुण पिढी पंतप्रधान मोदींसोबत (PM Modi) उभी आहे, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















