एक्स्प्लोर
Pigeon Row: 'एखादं-दुसरं माणूस मेल्यानं काय होतं?', Jain Muni कैवल्यरत्न महाराजांचा संतप्त सवाल
मुंबईतील कबुतरांच्या मुद्द्यावरून जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'एखाद दुसऱ्या व्यक्ती मेल्यानं काय होतं?', असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराज यांनी शांती सभेत विचारला आहे. इतकेच नाही, तर 'मी डॉक्टरांना मूर्ख मानतो' असेही ते म्हणाले. कबुतराची हत्या म्हणजे शंकरावर हल्ला करण्यासारखे आहे, असे विधानही या सभेत करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना मनीषा कायंदे यांनी, सर्व मेडिकल सायन्स बंद करून आरोग्य खातं जैन मुनींच्या हातात द्या, असा टोला लगावला. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या अविवेकीपणात मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. पूरग्रस्तांसाठी कोणी श्रद्धांजली सभा घेत नाही, पण कबुतरांसाठी एवढी तळमळ का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















