घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळवणं शक्य ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन विभागाच्या उपक्रमाची सुरुवात
शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी अनेकांना आरटीओत जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार जोडणी महत्वाची असून कोणतीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल. ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून अंमलात आणली गेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत डीलरमार्फत वाहन नोंदणीची प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने. वाहन खरेदी केल्यानंतर वाहन नोंदणीसाठी आरटीओत होणाऱ्या खेपा आता कमी होणार आहे. दरम्यान, ह्या दोन्ही सेवा ऑनलाइन झाल्या असल्या तरी त्या ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे.






















