(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HK Patil On Nana Patole : नाना पटोलेंना राज्य नव्हे केंद्र सरकार म्हणायचं होतं : एच के पाटील
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवण्याचं वक्तव्य करुन महाविकास आघाडीला धक्का देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसकडून पाठराखण करण्यात आलीय. पटोलेंच्या विधानाचा विपर्यास केला जातोय. आपला निशाणा राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारवर असल्याचं स्पष्टीकरण पटोलेंनी दिलंय. त्याचाच उल्लेख करत एच के पाटलांनी पटोलेंची पाठराखण केलीय. कोरोना संकटामुळे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पावसाळी अधिवेशनात झाली नाही. तरी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याचंही एच. के. पाटील यांनी ठणकावून सांगितलंय. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पटोलेंच्या विधानावर आणि विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.