Shinde Shiv Sena MP in Modi Cabinet : शिंदेंच्या 2 खासदारांची केंद्रीय कॅबिनेटमध्ये वर्णी : सूत्र
गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो 19 जून आधी होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.























