एक्स्प्लोर
Phaltan Case: डॉक्टरने जीवन संपवलं की हत्या?', अंधारेंची Rupali Chakankar यांच्या राजीनाम्याची मागणी
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणावरून शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला आहे. 'माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये, नाहीतर ऑफिसच्या बाहेर येथे क्लीन चीट वाटून मिळतील असा बोर्ड लावा,' असे टीकास्त्र सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर केले आहे. मृत डॉक्टर तरुणीने मृत्यूपश्चात व्हाट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) लाईक कसे केले, असा सवाल करत अंधारेंनी ही आत्महत्या नसून हत्या असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी महिला आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















