Dhairyashil Mohite Patil:पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी? पुढील आठवड्यात घोषणेची शक्यता
Dhairyashil Mohite Patil:पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी? पुढील आठवड्यात घोषणेची शक्यता
माढा लोकसभेबाबत एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी पाहूयात.. धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवारांची अखेर काल भेट झाल्याची माहिती मिळतेय. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. माढा लोकसभा उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक सिल्वर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. याबाबात मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती बोलण्यास तयार नाहीये. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर थांबलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत मोहिते पाटील यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीत मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी पवार याना सांगितल्या. या सगळ्यावर सोमवारी ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे .