Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Badlapur Rape Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, पोलिसांनी शाळेच्या ट्रस्टींना अटक केली आहे.
Badlapur Rape Case : बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या शाळेच्या ट्रस्टींचे नाव आहे. दोन्ही ट्रस्टींना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पोलिसांकडून आता शाळेच्या ट्रस्टींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करणार आहेत.
न्यायालयाने नाकारला होता अटकपूर्व जामीन
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या संस्थाचालक आणि सचिवांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींची याचिका फेटाळली होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. शिवाय न्यायालयाने आरोपींचा शोध घेण्यात तपासयंत्रणेला अपयश येत असल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारला देखील खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज पोलिसांनी कर्जत येथील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं
कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या दोन्ही संस्थाचालकांना पोलिसांनी अखेर कर्जतमधून अटक केली आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

अटकपूर्व जामीन मिळायची वाट पाहताय का? हायकोर्टाच राज्य सरकारला सवाल
कालच हायकोर्टानं दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. तसेच हायकोर्टानं राज्य सरकारला यावरून फार झापलं होतं. "त्यांना अटकपूर्व जामीन मिळायची वाट पाहताय का?", असा सवाल करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या