Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल
Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल
गली मधील विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालाय. चंद्रभान शर्मा अँड सन्स मध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेट्याची आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये एक डझन पेटीला पाच हजार पाचशे रुपये इतका उच्चाकी भाव मिळाला आहे. कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नानेकर यांच्या आंब्याला 5 हजार 500 इतका विक्रमी दर मिळाला आहे.. यानिमित्ताने आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आंब्याच्या हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला दर मिळायची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
हे ही वाचा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत धुसफुस आता शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. नव्या सरकारमधील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) नेमण्याच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेचे मंत्री (Shivsena Ministers) प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नेमण्याच्या ऑर्डर रखडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात (CMO Office) पडून आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांना स्वीय सहाय्यक आणि ओएसडी यांच्याशिवाय कारभाराचा गाडा रेटावा लागत आहे. त्यामुळे या मंत्र्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा मागे लागूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री कार्यालयावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.






















