(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis to BJP Leadrs : "कमीत कमी अपेक्षा ठेवा," मंत्रिपदासाठी इच्छूकांना फडणवीसांचा सल्ला
Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) अवघं राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल दिल्ली दौऱ्यावर होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं. परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास चार आठवडे झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.