(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 22 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.
भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
गिरीश महाजन (Girish Mahajan)
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)
आशिष शेलार (ashish Shelar)
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
तर शिंदे गटाकडून
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
उदय सामंत (uday Samat)
दादा भुसे (Dada Bhuse)
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना संधी मिळू शकते
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु तीन आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. आता ही दिल्लीवारी झाल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे ही राज्याच्या दौऱ्यावर, नियोजन सुरू
Maharashtra Politics : शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवरची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार