(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Farmers : कोथिंबीर, मेथीचे भाव पडले, फुकट कोथिंबीर घेण्यासाठी गर्दी
शेतकऱ्यांना कुणी वाली आहे, असा सवाल आता उपस्थित होतोय... एकीकडे मेथी, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे हाल... तर दुसरीकडे कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय... हे कमी म्हणून की काय उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती विधिमंडळात दिलीय... प्रत्यक्षात कृषी उत्पन्न समित्यांना याबाबत काहीही कळवलं नसल्यानं समिती आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे... आता हेही कमी म्हणून की काय, सरकारने कांद्यावरही फुलपट्टी लावली आहे... नाफेड 55 ते 70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात... असं झालं तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, त्यांचा कांदा कसा विकला जाणार, त्याला भाव मिळणार का, असे एक नाही अनेक प्रश्न विचारले जात आहेत... यावर आता विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झालाय...