एक्स्प्लोर
Political Conspiracy: 'त्यांनी ED लावली तर मी CD लावेन', म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातील वादग्रस्त CD चोरीला
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील घरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या चोरीत सोने, रोकड यासह काही महत्त्वाच्या सीडी (CD) आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) सुद्धा लंपास झाले आहेत. खडसे यांनी भाजप सोडताना इशारा दिला होता की, 'त्यांनी ED लावली तर मी CD लावेन'. आता त्याच सीडी चोरीला गेल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खडसेंच्या मते, चोरीला गेलेली कागदपत्रे भ्रष्टाचारासंबंधी होती जी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली होती. चोरीच्या आधी परिसरातील दिवे गेल्याने हा एक सुनियोजित कट असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे, तर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट सरकारवरच गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















