Maharashtra : हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1500 कोटींचं कंत्राट रद्द, किरीट सोमय्यांची माहिती
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1500 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं आहे. या संदर्भातील माहिती भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे. मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला 10 वर्षांचं 1500 कोटींचं कॉन्ट्रक्ट दिल होतं. यात महाराष्ट्रातील 27 हजार ग्राम पंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या 10 वर्षापर्यंत कंपनी फाइल करणार होती. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतने 50,000 रुपये प्रती वर्षी द्यावयाचं हे कॉन्ट्रॅक्ट होते. दर वर्षी जयोस्तूते मॅनेजमेंट कंपनीला यातून 1500 रुपये आवक होणार होती. परंतु आता हे कंत्राट रद्द करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.



















