ED : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीचं तिसरं पुरवणी आरोपपत्र, रोहित पवारांविरोधात पाऊल, एक्स पोस्टवरुन माहिती
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आणखी एक पाऊल टाकलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करत त्यामध्ये तीन नावं वाढवण्यात आली आहेत. आमदार रोहित पवार, मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांची नावं कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपावरुन 9 जुलै 2025 ला वाढवण्यात आली आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.ईडीनं आज सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्ट मुंबई यांच्याकडून 18 जुलैला प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती ईडीकीडून दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीकडून दाखल करण्यात आलेली तिसरी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली आहे.
रोहित पवार, बारामती अॅग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांच्या विरोधात यापूर्वीच ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखलं केलं आहे. मात्र, आज ईडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीवरुन ईडीनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात तिसरं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणाचा ईडीकडून तपास केला जात आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याची कथित बनावट लिलाव प्रक्रियेतून खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. 2009 मध्ये, एमएससीबीने कन्नड एसएसकेकडून 80.56 कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला होता. त्यानंतर संशयास्पद मूल्यांकनाच्या आधारे बँकेने अत्यंत कमी राखीव किमतीत लिलाव प्रक्रिया राबवली. ईडीचा आरोप आहे की ही लिलाव प्रक्रिया अनेक गंभीर अनियमिततेने भरलेली होती. सर्वाधिक बोली लावणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला दुर्बल आणि विवादित कारणे देऊन अपात्र ठरवण्यात आले, तर बारामती अॅग्रोशी संबंधित व्यक्ती, ज्यांची आर्थिक पात्रता व अनुभव संशयास्पद होता, त्यांना लिलावात सहभागी ठेवण्यात आले.
न्यायालयीन लढाई लढणार : रोहित पवार
या प्रकरणी रोहित पवार यांनी त्यांची बाजू पत्रकार परिषद घेत मांडली होती. ईडीने केलेल्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हतं. 97 लोकांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते. मात्र, मुद्दाम माझे नाव घेण्यात आले. माझी ईडीकडून अनेक वेळा 12 तास चौकशी करण्यात आली. मी न्यायालयात लढाई लढणार आहे. सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणार आहे. आम्ही पळून जाणार नाही. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
Directorate of Enforcement (ED), Mumbai Zonal Office has filed Supplementary Prosecution Complaint on 09.07.2025 in the case of Maharashtra State Cooperative Bank (MSCB) naming three persons / entity as additional accused viz. 1) Rohit Pawar 2) M/s Baramati Agro Limited & 3)…
— ED (@dir_ed) July 25, 2025























