(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajinikanth Birthday : थलैवा @71 ; अभिनेते रजनीकांत यांना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव ABP Majha
भौतिकशास्त्राच्या नियमांना चॅलेन्ज देणारे, गुरूत्वाकर्षणासारखा सर्वमान्य नियमही ज्यांनी आपल्या अॅक्शन सीन मधून खोटा ठरवला. वयाच्या सत्तरीनंतर बॉक्स ऑफिसवर कोट्टयांची उड्डाणे घेणारे रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते जगभरातील सर्वात प्रतिभाशाली आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेतल्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला असला तरी त्यांच्या सिनेमा हा भाषिक बंधनात अडकला नाही. जगभरात रजनीकांत यांचे करोडो फॅन्स आहेत. म्हणूनच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियानं त्यांचा आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली अवॉर्ड देऊन सन्मान केलाय. सिने क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलंय. नुकत्याच पार पडलेल्या ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना सिनेक्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलंय. आज ते वयाच्या ७२व्या वर्षात प्रवेश करत असले तरी त्यांचा उत्साहपूर्ण दमदार अभिनय पंचविशीतल्या अभिनेत्यांनाही लाजवणारा आहे..