CM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?
CM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाला दोन वर्षं होत आली, त्यावरची चर्चा मात्र अजून कायम आहे. शिंदे मुख्यमंत्री म्हणून कुणाला नको होते, यावरून आजही आरोप-प्रत्यारोप सुरू असतात...आता महाराष्ट्रातचं शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्यावर असताना शरद पवार आणि संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राजकारण रंगलंय...पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाला कुणी केला होता विरोध? २०१९ मध्ये मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं? भाजपलाही नको होते शिंदे मुख्यमंत्रिपदी? महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला इतर नेत्यांचा विरोध होता, असं बोललं जातं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या मतदानाचं टायमिंग सांगत या विषयाला नव्यानं फोडणी दिलीय. मविआच काय २०१९ च्या आधी भाजपलाही शिंदे मुख्यमंत्रिपदी नको होते, असं सांगत खळबळ उडवून दिलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
