एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Akola Clash: 'गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा', खासदार Anup Dhotre यांची मागणी
अकोल्यातील बैतपुरा भागात गोमांस विक्रीच्या संशयावरून बजरंग दल कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर भाजप खासदार अनुप धोत्रे आणि काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासदार अनुप धोत्रे यांनी 'गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे'. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन एका दुकानावर धाड टाकली, त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मारहाण झाल्याच्या वृत्ताला नकार दिला असला तरी, दोन्ही गट सिटी कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर जमले होते आणि त्यांनी एकमेकांवर कारवाईची मागणी केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















