Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Supriya Sule Amit Shah Meet: मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Municipal Corporation Election 2025) जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याचदरम्यान, आता महत्वाची माहिती समोर आली आहे. (Supriya Sule Amit Shah Meet)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात अमित शाहांसोबत भेट होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्या आणि बँकांची मनमानी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. (Supriya Sule Amit Shah Meet)























