City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 13 जुलै 2024 : 12 PM : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 13 जुलै 2024 : 12 PM : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार.
लोकसभेनंतर मोदींचा पहिला मुंबई दौरा, महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोदींच्या दौऱ्याला महत्व.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचं मोदींकडून भूमीपूजन, तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याचंही मोदी भूमीपूजन करणार.
मुंबईतील भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्राचं मोदींच्या हस्ते आज उद्घाटन, आयुर्मान संपत असल्याने जलशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी. .
काँग्रेसची ७ मतं फुटली यात आश्चर्य नाही, ही मतं आधीच फुटलेली होती, संजय राऊतांचं वक्तव्य.
कालची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती, आमदारांना काल २० कोटी ते २५ कोटींचा भाव, काही आमदारांना २ एकर जमिन देण्यात आली, संजय राऊतांचा गंभीर आरोप.
काही गद्दार बदमाश लोक आमच्यात होते, त्या बदमाश लोकांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
ज्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाही अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत, या आमदारांवर लवकरच कारवाई केली जाईल, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.