Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज(25 जानेवारी) मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते तसेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे कुटुंबीय उपस्थित झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत असलेल्या या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. या मोर्च्यानंतर एक सभा पार पडेल आणि त्यानंतर मोर्चा संपणार आहे.
दरम्यान, या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे पुढे आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे देखील सांगण्यात आले आहे. एकंदरीत राज्यातील अनेक भागात निघालेल्या आक्रोश मोर्चानंतर बीड आणि परभणीमधील घटनांची धग आता राज्याच्या राजधानीत पोहचल्याचे चित्र आहे.