Udayan Raje Bhosale will meet Sharad Pawar | भाजपचे खासदार उदयनराजे शरद पवार यांची भेट घेणार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी मोठी घडामोड दिल्लीत घडणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजे यांची ही पहिलीच भेट आहे.
उदयनराजे भोसले आज संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी भेटीला जातील. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शरद पवार आणि उदयनराजे हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्येही भेट होऊ शकते. परंतु ज्या अर्थी उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार असल्याने या भेटीला विशेष महत्त्व आहे.






















