Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!
Bachchu Kadu on Mahayuti : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आदी नेते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीने परिवर्तन महाशक्ती असं नाव दिलं आहे. 26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे.
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?
तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती.