![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti on Shaktipeeth ExpressWay : रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होवू देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा
राजू शेट्टी यांना रस्ते विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने पाचपट मोबदला देण्यात येईल, अस पत्र देण्यात आले होते.
![Raju Shetti on Shaktipeeth ExpressWay : रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होवू देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा Raju Shetti on Shaktipeeth ExpressWay says Bloodshed will flow but land acquisition will not be allowed Raju Shetti on Shaktipeeth ExpressWay : रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होवू देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/2e09b08bdfcf64cad0ee9e51d5a49f941726740801519736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raju Shetti on Shaktipeeth ExpressWay : रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांना रस्ते विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने पाचपट मोबदला देण्यात येईल, अस पत्र देण्यात आले होते. ते पत्र समोर आल्यानंतर शक्तीपीठ महामार्गावरून धूळफेक सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका बसणार? #maharashtraelection2024 #MaharashtraPolitics https://t.co/2ZKkZAm5m9
— ABP माझा (@abpmajhatv) September 19, 2024
राजू शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याचा घोषणा झाल्या. रस्ते विकास महामंडळाला महामार्गासाठी एकूण खर्च, डीपीआर काय हे समजून घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याचं उत्तर त्यांनी दिलं, त्यात ते म्हणाले 86 हजार कोटी खर्च येणार आहे. राजू शेट्टी यांनी सांगितले की, पत्रात म्हटलं आहे की, समृद्धीप्रमाणे मोबदला देण्याचं प्रस्तावित आहे, पण स्पष्टता देण्यात आलेली नाही. केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सीएम शिंदेंना पाठिंबा दिलेल्या महायुतीमधील सहयोगी आमदाराच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता! https://t.co/uhsNZB7ej3
— ABP माझा (@abpmajhatv) September 19, 2024
हा विषय व्हॉट्सॲप विद्यापीठात चालणारा
दरम्यान, एक देश एक निवडणूक मुद्यावर राजू शेट्टी यांनी खोचक टिप्पणी केली. ते म्हणाले की, आमचा या निर्णयावर विश्वास नाही. 2029 नंतर याची आंबल बजावणी करावी लागेल. लोकसभा झाल्या आणि चार महिन्यानंतर सरकार कोसळलं तर निवडणुका परत घेणार का? ही भ्रमिक कल्पना आहे, हा विषय व्हॉट्सॲप विद्यापीठात चालणारा असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)