Anna Hazare उपोषणाचा वाईन विक्री विरोधात निर्णय बदलणार? वल्सा नायर यांच्या भेटीनंतर आज घेणार निर्णय
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी उपोषणाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज निर्णय घेणार आहेत. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी अण्णांची भेट घेतली. सुमारे तीन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. सरकारने वाईन विक्री संदर्भात निर्णय घेतला असला तरी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये मुख्यतः राज्यातून या निर्णयाबाबत असलेल्या हरकती जाणून घ्यायच्यात अशी माहिती वल्सा नायर सिंह यांनी अण्णा हजारेंना दिली. या बैठकीनंतर अण्णा हजारे आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत. राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित उपोषणाचा इशारा दिलाय. त्यामुळे कालच्या बैठकीनंतर अण्णा काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागलंय.