एक्स्प्लोर
Ambadas Danve On Opposition Protest: शिवसेना भावनात येऊन भाजपच्याच नेत्यांनी आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशी चालते ते दाखवलं
मुंबईत मतदार यादीतील गोंधळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. 'खरंतर ही लढाई फक्त आमच्या पक्षाची नाही, मतदार राजाची लढाई आहे कारण मतदाराचा अवमान इथं होतोय,' असे खणखणीत मत दानवे यांनी व्यक्त केले. हा लढा लोकशाही वाचवण्यासाठी असून, सत्ताधारी यात सामील न झाल्याने त्यांचाच या प्रकारात सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उल्लेखासह, हा मोर्चा 'न भूतो न भविष्यति' असा होईल आणि निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावीच लागेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















