एक्स्प्लोर
Akshay Shinde encounter | पोलिसांना क्लीन चिट, पण SIT चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीन चीट देण्यात आली आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचा दावा आयोगाने मान्य केला. यापूर्वी राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना क्लीन चीट मिळाली होती, कारण अक्षयच्या कुटुंबियांची तक्रार नव्हती. मात्र, आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर आयोगाने काही सवाल उपस्थित केले आहेत. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. आता सुप्रीम कोर्टाने या आदेशात बदल करत, "कोर्टानं नव्हे, डीजीपीनं एसआयटी स्थापन करावी असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत।" असे स्पष्ट केले आहे. यामुळे पोलिसांना एका बाजूने दिलासा मिळाला असला तरी, दुसरीकडे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
करमणूक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















