(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule VS Ajit Pawar : माझ्या सकाळ उठण्याची चेष्ठा, सुळेंच्या टीकेला अजितदादांचं उत्तर
Supriya Sule VS Ajit Pawar : माझ्या सकाळ उठण्याची चेष्ठा, सुळेंच्या टीकेला अजितदादांचं उत्तर
ही बातमी पण वाचा
Ashok Chavan : शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय? : अशोक चव्हाण
Ashok Chavan, नांदेड : "आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही. कोणाचं आरक्षण काढून घेणे एवढे सोप नाही. मनोज जरागेंचे अनेक गैरसमज दूर केले आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबर मध्ये मतदान होईल असा अंदाज आहे", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. जालन्यातील परतूर येथे भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही
कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही, मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू असून त्यांचे अनेक गैरसमज दूर झालेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असा अंदाज देखील अशोक चव्हाण यांनी वर्तवला आहे.
पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.8) शरद पवारांच्या डोक्यातले कळायला देवेंद्र फडणवीस यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीका केली होती.याला प्रत्युत्तर देत त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा आम्हाला काय करायचं? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केलाय. दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केलाय.
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, माझी आणि बावनकुळे साहेबांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की, मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय मानसिकता आहे. त्या भागातील लोकांचं काय मत आहे. हे मी जाणतो समजतो. मला परतूर मतदारसंघामध्ये जाण्यास आवडेल, असं मी बावनकुळ यांना आवर्जुन सांगितलं.
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत अशोक चव्हाण यांनी आज दुपारी परतूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघातील अठरा पगड जातींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकिकडे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे फटका बसल्यानंतर अशोक चव्हाण मराठवाड्यात सक्रिय झाले आहेत.