Ajit Pawar At Rajkot Fort : अजित पवारांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, सुनील तटकरेही उपस्थित
Ajit Pawar At Rajkot Fort : अजित पवारांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, सुनील तटकरेही उपस्थित
दोन दिवसांपुर्वी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्यांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटतायत मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी यासंदर्भात मला माहिती दिली अनावरणाच्या वेळी सगळं चांगलं आणि व्यवस्थित होतं. लवकरात लवकर चांगल्यात चांगला पुतळा कसा उभारता येईल यासाठी आम्ही चर्चा केली काही लोक असं म्हणतात की गेल्या वेळस घाई झाली होती, त्यासंदर्भात लोकांनी भाष्यही केलं संपूर्ण प्रकरणाची बारकाईनं चौकशी आणि तपास सुरू आहे जो कुणी गुन्हेगार आहेत ते पळून-पळून कुठे जातील, देशाच्या बाहेर तर जाणार नाही राम सुतारांसोबत झालेल्या बैठकीमधे पुतळ्याच्या पुढील घडणीसंदर्भात चर्चा झाली प्रत्येकानं आपापलं तारतम्य बाळगलं पाहिजे...महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे (ठाकरे-राणे राडा) पुतळा पुन्हा उभारण्याचं काम ज्याला दिलं जाईल, त्याचा सगळा इतिहास-अनुभव लक्षात घेऊनच केला केला जाईल