Ajit Gavhane Join Sharad Pawar | विलास लांडेंचे समर्थक शहराध्यक्ष अजित गव्हाणेंच्या हाती तुतारी
Ajit Gavhane Join Sharad Pawar | विलास लांडेंचे समर्थक शहराध्यक्ष अजित गव्हाणेंच्या हाती तुतारी
Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांची अजितदादांना पुन्हा धोबीपछाड, दादांच्या बालेकिल्ल्यातील शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 20 जुलैला तुतारी फुंकणार
Ajit Pawar vs Sharad Pawar, Pimpri Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठा धक्का बसलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश सानेंनी राजीनामे दिले आहेत. प्रदेश कार्यालयात हे राजीनामे सोपविल्याची माहिती गव्हाणेंनी दिली आहे. या चौघांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची (NCP Sharad Pawar)तुतारी फुंकणार आहेत. येत्या 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र माजी आमदार विलास लांडेंच्या प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी आयरामांची गर्दी
अजित गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित गव्हाणे अजित पवारांची साथ सोडतील, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, आता अजित गव्हाणे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांनी प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली होती.