एक्स्प्लोर

Ahmednagar Hospital Fire : जिल्हा रुग्णालयातील आगीत 11 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला  लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र,  शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Ahmednagar collector Rajendra Bhosale) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. काल (शनिवारी) सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये (Ahmednagar Fire) अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळी घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
Youtube Web Series Dhindora: फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
Vikram Kakade Net Worth: आलिशान बोटी, महागड्या गाड्या, पार्थ पवारांना 10 कोटींचं कर्ज; विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विक्रम काकडेंची संपत्ती किती?
आलिशान बोटी, महागड्या गाड्या, पार्थ पवारांना 10 कोटींचं कर्ज; विक्रम काकडेंची चक्रावणारी संपत्ती
Gajlakshmi Rajyog: कर्क, वृषभ, कन्या, मीन...पुढच्या 4 दिवसांनी मनाप्रमाणे होण्याचे दिवस! 8 जूनचा पॉवरफुल 'गजलक्ष्मी राजयोग' नशीब पालटेल, डबल लाभ, पैसा दुप्पट...
कर्क, वृषभ, कन्या, मीन...पुढच्या 4 दिवसांनी मनाप्रमाणे होण्याचे दिवस! 8 जूनचा पॉवरफुल 'गजलक्ष्मी राजयोग' नशीब पालटेल, डबल लाभ, पैसा दुप्पट...

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Embed widget