Nashik Child Trafficking : चाईल्ड ट्राफिकिंग प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी : ABP Majha
बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयित तस्करीचं एक मोठं प्रकरण काल उघड़कीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये, तर २९ लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आलं. याप्रकरणी मनमाड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.. तर भुसावळमधील आरोपीला ५ दिवसांटी पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. रेल्वे पोलिसांकडून आरोपी आणि मुलांचा जबाब नोंदवला जाणार आहे.. तसेच बिहारमधील मुलांच्या पालकांशी देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.. या चौकशीत आणखी काय माहिती समोर येते? त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? हे रॅकेट आहे का?





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
