(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 01 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 01 September 2024
महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचा जोडेमारो आंदोलन मालवण मधला शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक ठाकरे पवार पटोलेंचा आंदोलनात सहभाग शिवद्रोही महायुतीला गेट आउट करा उद्धव ठाकरेंचा घणाघात
तर महाविकान पाणी जनजीवन विस्कळी यवतमाळ हिंगोली सह परभणी मध्ये तुफान पाऊस
वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीन धोक्याची पातळी ओलांडली
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा धनोडापूल पाण्याखाली
लालबाग परळ परिसरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगभग ढोल ताशांच्या गजरात अनेक बाप्पा मंडपात.
पूजेच साहित्य मखर खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या
*ही बातमी पण वाचा*
साता समुद्रापार भगवद्गगीता परीक्षा, HUA मध्ये विद्यार्थ्यांकडून गीतेचे श्लोक पठण, अर्थही समजावला
मॉरिसविल : भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून प्रत्येक धर्माला आपला धर्म आणि संस्कृती जपण्याचे, वाढवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे, हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वच धर्माचे लोकं भारतात गुण्या-गोविंदाने नांदतात. त्यात, हिंदूंची संख्या अधिक असल्याने हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी हिंदू संघटना, धर्मपीठ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून उप्रकम घेतले जातात. मात्र, साता समुद्रापलिकडेही आपला धर्म आणि संस्कृती जपली जात असल्याचं दिसून आलं. नुकतेच अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे दुसरी वार्षिक भगवद् गीता परीक्षा संपन्न झाली. 24 ऑगस्ट रोजी हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथे दुसरी वार्षिक गीता परीक्षा संपन्न झाली. संयुक्त विद्यमाने स्वयंसेवकांचे आयोजन करून, निधी उभारून आणि एक अनोखी स्पर्धा निर्माण करुन हिंदू समुदायाला एकत्र आणण्यासाठी संयोजकांनी मेहनत घेतली होती. साता समुद्रापार ही स्पर्धा यशस्वी आणि उत्स्फूर्तपणे पार पडल्याने संयोजकांच्या मेहनतीचं सार्थक झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला आहे.
हिंदू (Hindu) युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका, फ़्रेंड्स ऑफ हिंदू यूनिवर्सिटी ऑफ अमेरिका आणि एनसी विभाग प्रमुख डॉ. राज पोलावरम भगवद्ग गीता परीक्षा स्पर्धेनंतर बोलताना म्हणाले की, ''सध्या लोकं तात्पुरत्या, क्षणिक गोष्टींना ग्लॅमर बनवतात, पण भगवद् गीतासारख्या चांगल्या गोष्टींचा अधिक प्रचार व प्रसार व्हावा. त्यामुळेच आम्ही भगवद् गीता परिक्षेची ही संकल्पना मांडली. गीतापठणाच्या अनेक स्पर्धा आहेत, पण आम्हाला भगवद् गीतेच्या अर्थावरही जोर द्यायचा होता. त्यामुळे आम्ही हा उपक्रम गेल्यावर्षी सुरू केला आहे, आणि यावर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. अमेरिकेच्या (America) नॉर्थ कॅरोलिनामधील 52 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.