ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 23 July 2024 Marathi News
काही क्षणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळणार ? रेल्वे मार्ग, नव्या गाड्या, पायाभूत सुविधांसाठी निधीची अपेक्षा..
शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता, शेतकरी आणि ग्रामीण विकासावर भर राहतो की शहरंच बजेटचा केंद्रबिंदू राहणार याकडं लक्ष
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ५० नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची शक्यता, एमएमआर रिजनमध्ये सहा नव्या टर्मिनसचीही भेट राहण्याचा अंदाज..
महागाई कमी करा, शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमतीसाठी काही तरी करा, विकास दर १६ ते १७ टक्क्यांपर्यंत न्या...महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी वाचून दाखवली अपेक्षांची यादी...
मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास होणार वेगवान, कर्जत ते तळेगाव दरम्यान नवा रेल्वेमार्ग उभारण्याचा विचार, सविस्तर अहवाल देण्याची अधिकाऱ्यांना सूचना..