ABP Majha Headlines : 10 AM : 26 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये राडा... दिशा सॅलियानप्रकरणी उत्तर देण्याची भाजपकडून घोषणाबाजी... आंदोलक पोलिसांच्या ताब्यात..
जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक, मुंबईच्या जागांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, दीर्घ आजाराने हैदराबादमधील किम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
पुणे विमानतळाला संत तुकारामांचं नाव देण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव द्यावा, हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची सूचना...
केंद्र सरकारची युनिफाइड पेन्शन योजना महाराष्ट्रानं स्विकारली, महाराष्ट्र ठरलं देशातलं राज्य, मार्च २०२४ पासून अंमलबजावणी गृहीत धरणार...
पंढरपूरला पुराचा धोका वाढला, उजनीतून भीमेत तर वीर धरणातून नीरेत विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळं मराठवाड्याला दिलासा, जायकवाडीमधला पाणीसाठा ४५ टक्क्यांवर..वैजापूरमधल्या १७ गावांना पुराचा धोका...
पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या निहालसिंग टाकला अटक, भांडण सोडवायला गेलेेले एपीआय रत्नदीप गायकवाड हल्ल्यात जखमी...