ABP Majha Headlines : 12: 00 PM 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना, चौकशीसाठी पल्लवी सापळे रूग्णालयात दाखल
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर अंबादास दानवेंचा आक्षेप, चौकशी करणारे किती स्वच्छ? दानवेंचा सवाल, तर नियुक्ती शासनानं केली.. सापळेंचं प्रत्युत्तर
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज बैठक, मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार
पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारासंघात टक्का घसरला
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं, मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता
मुंबई शिक्षण मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीनं लढवावी छगन भुजबळांची भूमिका...देवगिरी बंगल्यावरील बैठकीत चर्चा
लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती, लोकसभेच्या स्ट्राईकरेटनुसार ठरणार विधानसभेचं जागावाटप
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका, ब्रह्मपुरी शहरात ४७.१ अंश तापमान, पश्चिम विदर्भातही हीट वेव्ह
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, रात्री ८ वाजता मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
विधानसभेच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये नाराजी, युतीविरोधातलं वक्तव्य खपवून घेणार नाही, माजी खासदार निलेश राणेंची टीका,
रक्ताचे सँपल बदलणाऱ्या ससूनमधीन दोन डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची कारवाई सुरू, सात दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आदेश, पुरावे तपासून कॉऊन्सिल करणार कारवाई
परदेशात नोकरीचं आमिष दाखवत मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना दणका, एनआयए आणि राज्य पोलिसांचे ८ राज्यात १५ ठिकाणी छापे, देशभरात 5 जणांना अटक